
सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. त्यामुळेच या ग्रहाने चाल बदलली की त्याचा परिणाम अनेक राशींवर होतो. सध्या सूर्य ग्रह मकर राशीत विराजमान आहे. फेब्रुवारी महिन्यात हा ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे एकूण तीन राशींवर मोठे संकट ओढावणार आहे.

कर्क राशीच्या लोकांच्या कामांना उशीर लागू शकतो. तसचे ऑफिस पॉलिटिक्समुळे खूप त्रास होण्याची शक्यता आहे. आर्थिक पातळीवर खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही भांडणापासून दूर राहा.

मीन राशीच्या लोकांनीही काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. कुठे गुंतवणूक करत असाल तर त्यामुळे डोकेदुखी वाढू शकते. कामाच्या ठिकाणी जास्त ताण-तणाव येऊ शकतो. व्यापार करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळेच कोणताही निर्णय घेताना खूप विचार करा.

कन्या राशीच्या लोकांवरही अनेक संकटं येण्याची शक्यता आहे. धनसंपत्तीच्या बाबतीत मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. कुठेही प्रवास करताना काळजी घ्या. आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.