

मॉर्निंग वॉक केल्याने हृदय हेल्दी राहते. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा हृदयाचा वेग वाढतो आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. तसेच रक्ताभिसरणही सुधारण्यासही मदत होते. दररोज सुमारे 2 मैल चालल्यास हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

सकाळी चालल्याने स्नायू मजबूत होतात. वॉकमुळे पाय आणि पोटाच्या स्नायूंना ताकद मिळते. त्यामुळे एकूण आरोग्यही सुधारतं.

मॉर्निंग वॉक

मॉर्निग वॉकमुळे मानसिक आरोग्यही सुधारण्यास मदत होते. नियमितपणे चालायला गेल्यास आपल्या मूडमध्ये बरीच सुधारणा होतो. तसेच त्यामुळे डिप्रेशनची लक्षणेही कमी होऊ शकतात.

सकाळी नियमित चालणे हे अल्झायमरचा धोका देखील कमी करू शकते. 71 ते 93 वयोगटातील पुरुषांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की दिवसातून एक चतुर्थांश मैलापेक्षा जास्त चालणे डिमेंशिया आणि अल्झायमर रोगाचा धोका कमी करू शकते. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)