Dashavatar : या 5 कारणांसाठी पहायलाच हवा ‘दशावतार’; म्हणूनच होतेय कोट्यवधींची कमाई

Dashavatar : 'दशावतार' या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. हा चित्रपट पाच कारणांसाठी पहायलाच हवा. ही पाच कारणं कोणती, ते सविस्तर वाचा..

| Updated on: Sep 15, 2025 | 1:21 PM
1 / 6
सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत तीन कोटींहून अधिक कमाई केली आहे. थिएटरमध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल होत आहेत. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी अशी कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. तसं तर 'दशावतार' थिएटरमध्ये पाहण्याची अनेक कारणं आहेत. परंतु त्यापैकी पाच महत्त्वाची कारणं आपण जाणून घेऊयात..

2 / 6
1- कथानक- कोकणातील पारंपरिक लोककला आणि त्याचं मर्म समजून घेत त्या माध्यमातून कोकणातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी केला आहे. बाप-लेकाच्या प्रेमापासून सुरू झालेली ही कथा कोकणात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश करू पाहणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष उभा करणाऱ्या गावकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचते. ही अनोखी कलाकृती मराठीसह इतर भाषिक प्रेक्षकांनाही भावली आहे.

3 / 6
2- सिनेमॅटोग्राफी- या चित्रपटाची मांडणी करताना कोकणातील जंगलं, कातळशिल्प, नदी, मंदिरं आणि तिथं रंगणारा दशावतार या सगळ्यांचा दिग्दर्शकाने सुंदर वापर करून घेतला आहे. या चित्रपटातील दृश्ये कुठेही कृत्रिम वाटणार नाही, इतक्या सुंदर पद्धतीने सिनेमॅटोग्राफ देवेंद्र गोलतकर यांनी सर्वकाही टिपलं आहे. कोकणातील घनदाट जंगलात अनुभवायला मिळणारी गूढता, शांतता जशाच्या तशा पोहोचवण्यासाठी तांत्रिक बाबींवर प्रचंड मेहनत घेतलेली दिसून येते.

4 / 6
3- कलाकारांचा अभिनय- दशावतारी नट हा रात्रीचो राजा असता असं म्हटलं जातं. रात्री रंगणाऱ्या खेळात चेहऱ्याला रंग लावून दिलीप प्रभावळकर यांनी अत्यंत ताकदीने पात्र साकारलं आहे. महेश मांजरेकर, सुनील तावडे, रवी काळे, अभिनय बेर्डे, विजय केंकरे या सगळ्यांनीच त्यांच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा वेगळी व्यक्तिरेखा उत्तमपणे साकारली आहे. प्रियदर्शिनीला पहिल्यांदाच नायिकेच्या पलिकडे जात काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली आहे.

5 / 6
4- मेकअप- दशावतार म्हटलं की त्यात मेकअप हा त्याचा अविभाज्य घटक येतोय. दशावतारी खेळ रंगवणाऱ्या कलाकारांचा मेकअप प्रत्येक दृश्यात अप्रतिम दिसून येतो. त्याचसोबत साऊंड, म्युझिक यामुळे चित्रपट पाहताना अनोखा अनुभव येतो.

6 / 6
5- एडिटिंग- कोणत्याही चित्रपटात एडिटिंगला खूप महत्त्व असतं. छोटे-छोटे भाग एकत्र आणून, त्यांची योग्य मांडणी करून प्रेक्षकाला संपूर्ण चित्रपटाचा चांगला अनुभव देण्याचं काम एडिटर करत असतो. जितकं एडिटिंग चांगलं, तितकी कथेची मांडणी चांगली दिसून येते. 'दशावतार'च्या यशात या एडिटिंगचाही मोठा वाटा आहे.