Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन राजकारण करणार? अमृता फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर, काय म्हणाल्या?

Amruta Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या वाचा...

| Updated on: Sep 12, 2026 | 1:04 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या चर्चेत आहेत. त्यांनी गरब्यातील मुस्लिमांच्या बंदीवर प्रतिक्रिया दिली होती. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीत सारखं का जातात? यावर वक्तव्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या चर्चेत आहेत. त्यांनी गरब्यातील मुस्लिमांच्या बंदीवर प्रतिक्रिया दिली होती. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीत सारखं का जातात? यावर वक्तव्य केले आहे.

2 / 5

देवेंद्र फडवणीस हे सातत्याने दिल्ली दौरा करतात, त्यामुळे भविष्यात ते दिल्लीत जाऊन राजकारण करतील अशा राजकीय चर्चा सुरू असतात असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला होता.

3 / 5

याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, ते दिल्ली दौरा करतात मात्र महाराष्ट्रासाठी अनेक योजना मंजूर करून आणायचे काम करतात. ते महाराष्ट्रासाठी झटतात याचा मला अभिमान आहे.

4 / 5

पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा, तसेच कामगिरीशी निगडित प्रोत्साहनपर भत्त्यातील भेदभाव दूर करून द्विपक्षीय करारातील तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी आंदोलन करत आहेत, यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

5 / 5

आंतरराष्ट्रीय बँका या शनिवार आणि रविवार सुट्टी देतात. मात्र आपल्याकडे खाजगी आणि सरकारी बँक अद्याप सुट्ट्या देत नाहीत. हा धोरणात्मक निर्णय आहे आणि त्यावरती लवकरच तोडगा निघेल असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us