मुस्लीम पतीसोबत भीमाशंकरला पोहोचली ‘गोपी बहू’; म्हणाली ‘धन्य झाले!’

'साथ निभाना साथियाँ' फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी नुकतीच भीमाशंकर मंदिरात पोहोचली होती. यावेळी तिचा मुस्लीम पती शाहनवाजसुद्धा तिच्यासोबत होता. देवोलीनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

| Updated on: Jun 30, 2025 | 9:18 AM
1 / 5
‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी घराघरात पोहोचली. 2022 मध्ये तिने शाहनवाज शेखशी आंतरधर्मीय लग्न केलं. या लग्नामुळे तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. देवोलीनाने नुकताच मुलाला जन्म दिला.

2 / 5
पती आणि मुलासोबत देवोलीना नुकतीच गुवाहाटीमधल्या भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी तिने मुलासोबत शंकराची पूजा केली आणि आशीर्वाद घेतला. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

3 / 5
यावेळी देवोलीनाने साधा गुलाबी रंगाचा सूट परिधान केला होता. देवोलीना आणि शाहनवाज यांनी त्यांच्या मुलाचं नाव ‘जॉय’ असं ठेवलंय. पती आणि मुलासोबत देवोलीनाने फोटोसाठी पोझ दिले.

4 / 5
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये देवोलीनाने लिहिलं, ‘गुवाहाटीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या भीमाशंकर धाम यात्रा करून आम्ही धन्य झालो. हे पवित्र ज्योतिर्लिंग फक्त अध्यात्माचा खजाना नसून आपल्या आसपासच्या ऊर्जेचीही आठवण करून देतो. आस्था, शांती आणि भक्तीने कुटुंबीयांसोबत घालवलेले क्षण.’

5 / 5
देवोलीनाचा पती मुस्लीम असला तरी तो तिच्यासोबत शंकराच्या मंदिरात गेल्याने नेटकरी त्याचं कौतुक करत आहे. एकमेकांच्या धर्माचा आदर करत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर दुसरीकडे लग्नानंतरही देवोलीनाने तिचा धर्म सोडला नाही, असं म्हणत काहींनी तिचं कौतुक केलं आहे.