‘धडकन’मध्ये अचानक बदललेली ही भूमिका, कोणाला कळलंसुद्धा नाही; 25 वर्षांनंतर रील व्हायरल होताच अभिनेत्रीची प्रतिक्रिया

'धडकन' या चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेसंदर्भातील रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 25 वर्षांनंतर त्यातील एका अभिनेत्रीने भूमिकेबाबत खुलासा केला आहे. ही भूमिका चित्रपटातून अचानक बदलण्यात आली होती.

| Updated on: Oct 07, 2025 | 10:39 AM
1 / 5
2000 साली प्रदर्शित झालेला 'धडकन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या चित्रपटातील गाणी आणि त्यातील डायलॉग्स आजसुद्धा प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. धर्मेश दर्शन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका होत्या.

2 / 5
या सुपरहिट चित्रपटात एक भूमिका अशी होती, जी निर्मात्यांनी अचानक बदलली होती. 'धडकन' पाहिलेल्या कित्येक प्रेक्षकांना याबद्दल कल्पनासुद्धा नसेल किंवा त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आजवर आलीही नसेल. सध्या त्यासंदर्भात एक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

3 / 5
ही भूमिका होती अक्षय कुमारच्या ऑनस्क्रीन बहिणीची. अभिनेत्री नवनीत निशानने आधी चित्रपटात अक्षयच्या बहिणीची भूमिका साकारली होती. परंतु चित्रपटात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीच्या लग्नानंतर तिची भूमिका अचानक बदलते. नवनीतची जागा नंतर मंजित कुल्लरने घेतली.

4 / 5
आता 25 वर्षांनंतर जेव्हा यासंदर्भात रील सोशल मीडियावर व्हायरल झाली, तेव्हा नवनीतने तिच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. या रीलवर कमेंट करत तिने लिहिलं, 'होय, माझं लग्न झालं आणि त्यानंतर मी अमेरिकेला स्थलांतरित झाले. म्हणून माझी भूमिका अचानक बदलली गेली.'

5 / 5
'मला आजसुद्धा त्या गोष्टीचा पश्चात्ताप होतो. धर्मेशजींच्या चित्रपटात ती ग्लॅमरस भूमिका साकारण्याची संधी मी गमावून बसले', अशा शब्दांत तिने खंत व्यक्त केली.