भारतातील असे ठिकाण जिथे रस्त्याचा होतो अंत, रामायणातही आहे उल्लेख

Indias Last Raod : भारताच्या तिन्ही पूर्व, पश्चिम, दक्षिण या दिशांना समुद्र आहे, तर उत्तरेला हिमालय पर्वतरांग आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील शेवटच्या रस्त्याची माहिती सांगणार आहोत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Updated on: Nov 30, 2025 | 6:10 PM
1 / 5
भारताचा शेवटचा रस्ता दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात आहे. धनुषकोडी नावाच्या ठिकाणी हा रस्ता आहे. इथे या रस्त्याचा अंत होतो आणि समुद्राला सुरुवात होते.

2 / 5
रस्त्याने जाता येणारे हे भारतातील शेवटचे ठिकाण आहे. येथून समुद्र सुरू होतो आणि या ठिकाणापासून श्रीलंका फक्त 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे.

3 / 5
तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या आग्नेय किनाऱ्यावर धनुषकोडी नावाचे शहर आहे. या ठिकाणी भारतातील शेवटच्या रस्त्याचा अंत होतो आणि त्यानंतर पाल्क सामुद्रधुनी सुरू होते.

4 / 5
रामायणात धनुषकोडी शहराचा उल्लेख करण्यात आला होता. असे मानले जाते की भगवान श्री राम लंकेला जाण्यासाठी निघाले तेव्हा या ठिकाणापासून रामसेतूचे बांधकाम सुरू केले होते.

5 / 5
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 87 हा रामेश्वरम आणि धनुषकोडीला जोडतो. हा महामार्ग हिंदी महासागर बंगालच्या उपसागराच्या सीनेवर आहे. या ठिकाणाला अनेक पर्यटक भेट देत असतात.