‘धूप में निकला न करो…’ अमिताभ यांच्यासोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री 30 वर्षांपासून गायब, 300 चित्रपटांमध्ये केलंय काम

धूप में निकला न करो या गाण्यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री 30 वर्षांपासून गायब? 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये केलं आहे काम.

| Updated on: Mar 24, 2026 | 11:18 AM
1 / 5
80-90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे बदल घडत होते. या काळात अनेक नवीन कलाकारांनी आपली ओळख निर्माण केली. हा काळ खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ मानला जातो.

80-90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे बदल घडत होते. या काळात अनेक नवीन कलाकारांनी आपली ओळख निर्माण केली. हा काळ खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ मानला जातो.

2 / 5

श्रीदेवी, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर यांसारख्या अभिनेत्रींसोबतच साऊथ इंडस्ट्रीमधील अनेक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींचाही या काळात मोठा दबदबा होता. याच काळात नावाजलेली अभिनेत्री माधवी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

3 / 5

साऊथ सिनेमात मोठं नाव कमावल्यावर तिने बॉलिवूडमध्येही आपली छाप पाडली. तिच्या कारकिर्दीत तिने 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली.

4 / 5

‘अंधा कानून’, ‘गिरफ्तार’ आणि ‘अग्निपथ’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं. त्यांचे ‘धूप में निकला न करो रूप की रानी...’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. मात्र, करिअरच्या शिखरावर असतानाच माधवीने एक मोठा निर्णय घेतला.

5 / 5

14 फेब्रुवारी 1996 रोजी तिने बिझनेसमन राल्फ शर्मा यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर माधवी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे स्थायिक झाली. आज माधवी गेल्या जवळपास 30 वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे आणि आपल्या कुटुंबासोबत साधं, शांत आयुष्य जगत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us