
अक्षय खन्ना सोशल मीडियापासून नेहमी लांब असतो. अक्षय खूप खासगी व्यक्ती आहे. स्वत:च्या विश्वात राहणं त्याला आवडतं. त्याचे वडिल विनोद खन्नांबद्दल सगळ्यांना माहित आहे. पण आज आम्ही तुम्हाला अक्षयचा भाऊ राहुल खन्ना बद्दल सांगणार आहोत.

राहुल खन्ना अक्षयचा भाऊ आहे. अक्षय आणि राहुल ही विनोद खन्ना यांची पहिली पत्नी गीतांजली तेलियारची मुलं आहेत. विनोद खन्ना यांना दुसरी पत्नी कविता दफ्तरीपासून एक मुलगा आणि मुलगी आहे. अक्षय प्रमाणे राहुल खन्नाने सुद्धा बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवलं. आज तो यशस्वी मॉडल आणि व्हीजे आहे. राहुल बॉलिवडूमध्ये राइटर म्हणून काम करतो.

राहुल अक्षयपेक्षा मोठा आहे. अक्षयने व्यावसायिक चित्रपटात आपला करिश्मा दाखवला. राहुलने आर्ट फिल्मसचा मार्ग निवडला. त्याने 1999 साली आलेल्या दीपा मेहताच्या 1947 अर्थ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केलेला. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होता.

या चित्रपटामुळे राहुलला बेस्ट मेल डेब्यू अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर राहुलने रणबीर कपूरची फिल्म वेक अप सिड मध्ये भूमिका साकारली. राहुलने टीव्हीवर वीजे म्हणून काम केलं. त्याने MTV एशियामध्ये 1994 ते 1998 पर्यंत काम केलं. त्यानंतर डिस्कवरी चॅनलवर सुद्धा होता.

राहुलने ओटीटीवर सुद्धा काम केलय. 2019 साली आलेल्या नेटफ्लिक्सवरील वेब सीरीज 'लैला'मध्ये काम केलेलं. राहुलने अनेक मोठे शोज आणि ब्यूटी पेजेन्ट्स होस्ट केले आहेत. अनेक मोठ्या ब्रांड्सचा तो फेस राहिला आहे.