एका गाण्यावरून बनवला पूर्ण चित्रपट; अभिनेत्री पूजा भट्टसोबत… यामधील एक गाणं आजही गुणगुणतात लोक
90च्या दशकातील ‘दिल है के मानता नहीं’ हा चित्रपट आणि त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आमिर खान आणि पूजा भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टायटल ट्रॅक विशेष लोकप्रिय ठरला. कानपूरचे गीतकार फैज अनवर यांनी हे गाणे लिहिले होते. आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

महेश भट्ट यांची भेट फैज अनवर यांची महेश भट्ट यांच्याशी भेट रूप कुमार राठौर यांनी करून दिली. त्यावेळी ‘आशिकी’साठी गाण्यावर काम सुरू होते.
अवघ्या 35 मिनिटांत गाणे फैज अनवर यांनी धून ऐकून अवघ्या 35 मिनिटांत गाणे लिहिले. त्यांनी सांगितले, “रूप कुमार राठौर ने मेरी मुलाकात महेश भट्ट से करवाई थी.”
गाणे ऐकून कौतुक गाण्याच्या ओळी ऐकल्यानंतर महेश भट्ट यांनी फैज अनवर यांना मिठी मारली. त्यांनी हे गाणे आपल्या पुढील चित्रपटात घेण्याचे ठरवले.
गाण्यावरच चित्रपट ‘दिल है के मानता नहीं’ हा चित्रपट 12 जुलै 1991 रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटातील टायटल साँगसह इतर गाणीही लोकप्रिय झाली.
कुमार सानू-अनुराधा पौडवालचा आवाज या गाण्याला कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांनी आवाज दिला. आजही कॉलेज लव्हर्स आणि जुन्या गाण्यांच्या चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणे आवडीने ऐकले जाते.