वास्तू टिप्स : डायनिंग टेबलवर ठेवताय ‘या’ 5 गोष्टी, येऊ शकते मोठ्या अडचण, करू नका दुर्लक्ष
वास्तूशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत. डायनिंग टेबलसाठी वास्तूशास्त्रात काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. अनेकांच्या घरात डायनिंग टेबल असतो. ज्यावर आपण अनेक वस्तू ठेवतो... पण काही अशा गोष्टी आहेत, ज्या डायनिंग टेबलवर ठेवताना तुम्हाला एकदा तरी विचार करायला हवा... त्या कोणत्या गोष्टी आहेत जाणून घ्या...

औषधे: वास्तुशास्त्रानुसार, डायनिंग टेबलवर औषधं कधीही ठेवू नयेत. डायनिंग टेबलवर ठेवलेल्या औषधांचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आजारी व्यक्त प्रकृती सुधारावी म्हणजे उपचार घेत असतो... म्हणून डायनिंग टेबलवर औषधं ठेऊ नका.

फुटलेली भांडी: तुमच्या डायनिंग टेबलवरील ताट, कप किंवा चमचा तडकलेला किंवा तुटलेला असल्यास, तो ताबडतोब काढून टाकावा. कारण फुटलेली भांड्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.. असं सांगितलं जातं...

अनावश्यक कागदपत्रे आणि बिले: बहुतेक वेळा लोक डायनिंग टेबलवर जुनी बिले, पावत्या किंवा अनावश्यक कागदपत्रे ठेवतात. वास्तूनुसार, यामुळे नकारात्मक परिणाम वाढू शकतात. डायनिंग टेबल कायम स्वच्छ असायला हवं.

रिकामी मीठदाणी: वास्तूनुसार मीठ हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. डायनिंग टेबलवर मीठदाणी कधीही रिकामी ठेवू नका. मीठदाणी भरलेली ठेवणे शुभ मानले जाते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)