
अभिनेत्री दिशा पटानीच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. गोल्डी ब्रार टोळीतील एकूण पाच शूटर दिशा पटानीच्या घरी गोळीबार करण्यासाठी गेले होते...

पाच शूटरपैकी दोन गुन्हेगारांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघं आरोपी गंभीर जखमी झाले होते. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं

पाच शूटरपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण फरार आहे. पोलीस दोघांचा कसून शोध घेत आहे. पाच शूटरला पाठवून दहशत माजवण्याची होती योजना, मात्र एकाची तब्बेत बिघडल्याने गोळीबारावेळी चौघेच गेले होते.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबर रोजी बरेली येथील एका पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे कैद झाले होते आणि त्यांचा शोध सुरूच आहे.

परदेशात असलेले गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांनी त्यांच्या हँडलरद्वारे पाच शूटर बरेलीला गोळी बारासाठी पाठवल्याची पोलीस तपासात माहिती समोर येत आहे. 11 सप्टेंबर रोजी चार शूटर बाईकवरून दिशा पटानीच्या घरी आले आणि त्यांनी रेकी केली त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन गोळीबार केला.