Dmart Shopping: डीमार्टमध्ये झुंबड उडाली, बिलावर थेट 1500 रुपये वाचतायेत म्हणून ग्राहकांची तुफान गर्दी
Dmart Diwali Shopping: दिवाळीत शॉपिंग करताना जर तुम्हाला ५०० आणि १००० नाही तर थेट १५०० रुपये वाचवायचे असेल तर तुम्ही ही साधी ट्रीक वापरु शकतात.

सणासुदीच्या काळात प्रत्येक मध्यमवर्गीय घरात फराळ हा बनतोच. यासाठी लोक खूप प्रमाणात किराणा सामानही भरतात. किराणा सामान खरेदी करण्यासाठी लोक डी-मार्टमध्ये खूप गर्दी करतात.
डीमार्ट सर्व वस्तू 'डीमार्ट प्राईस'वर विकते, जी एमआरपीपेक्षा खूपच कमी असते. यामुळे काही स्मार्ट ट्रिक्स वापरून मध्यमवर्गीय कुटुंबे डीमार्टमध्ये जास्तीत जास्त खरेदी करुन त्यावर बचतही करू शकतात.
गर्दी टाळण्यासाठी आणि शांतपणे वस्तू निवडण्यासाठी 'DMart Ready' ॲपवरून घरबसल्या ऑर्डर करू शकतात. जवळच्या पिक-अप पॉईंटवरून सामान घेऊही शकतात किंवा होम डिलिव्हरीही निवडू शकतात. तुम्ही जर योग्य नियोजनाने या दिवाळीत ३००० ते ५००० रुपयांच्या बिलावर सहज ८०० ते १५०० रुपये वाचवू शकतात. या दिवाळीत थेट तुम्हाला १५०० रुपये वाचवता येतील ज्यामुळे खिशाचा ताण कमी होईल.
घरबसल्या फक्त गरजेच्या वस्तू कार्टमध्ये टाकण्यासाठी DMart Ready ॲप वापरा. १००० रुपयांवरील ऑर्डरवर जवळच्या पिक-अप पॉईंटवर फ्री डिलिव्हरी मिळते, ज्यामुळे वेळ, पेट्रोल आणि जास्तीचा खर्च वाचतो ज्याने अर्थात तुमच्या बिलावर मोठ्या प्रमाणत फरक पडतो.
खरेदी करण्यापूर्वी प्राईस तपासा, कारण ऑफरमधील १ किलोच्या पॅकेटपेक्षा ५०० ग्रॅमची दोन पॅकेट्स स्वस्त असू शकतात. यामुळे ५% अतिरिक्त बचत होते. जास्त काळ टिकणाऱ्या होम केअर वस्तूंवरच ऑफर्सचा वापर करा. उगाचच फक्त डिस्काउंट मिळतोय म्हणून अनावश्यक फराळाचे पदार्थ घेतल्यास बजेट वाढेल. इतर ब्रँडेड कंपन्यांऐवजी 'Premia' ब्रँडचे धान्य, डाळी, मसाले, साखर आणि सुकामेवा खरेदी करा, इथे तुमचे बिल थेट १५% ते २५% कमी होते.