DMart: डीमार्ट स्टोअर की डीमार्ट रेडी अ‍ॅप? कुठून खरेदी केल्यास सामान जास्त स्वस्त मिळते?

DMart: अनेकजण महिन्याच्या सुरुवातीला राशन भरण्यासाठी डी-मार्टमध्ये जातात. कारण येथे सामान योग्य दरात मिळते. पण डीमार्टचे ‘डीमार्ट रेडी’ हे ऑनलाइन अॅप देखील आहे. त्यामुळे डीमार्ट स्टोअरमध्ये जाणे की अॅपवरुन खरेदी करणे चांगले जाणून घ्या..

| Updated on: Aug 10, 2026 | 10:40 AM
1 / 5
स्वस्त दरात उत्तम दर्जाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेकजण डीमार्ट जातात. डीमार्टमध्ये छोट्या छोट्या सामानावर मोठी सूट दिलेली असते. पण कंपनीने ‘डीमार्ट रेडी’ ही ऑनलाइन सेवा देखील सुरु केली आहे. येथे किराणा, घरगुती वस्तू, भाज्या-फळे, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सगळं घरी बसल्या मिळत आहे. मात्र अनेकांना प्रश्न पडतो की ऑफलाइन स्टोअर की डीमार्ट रेडी अॅप/वेबसाइट? कुठून खरेदी केल्यास जास्त फायदा होता.

2 / 5
किंमतींची तुलना केल्या, आशीर्वाद आटा (10 किलो) दोन्ही ठिकाणी (अॅप आणि स्टोअरमध्ये) 545 रुपये, पण अॅपवर 500 रुपयांच्या खरेदीवर 50 रुपये कॅशबॅक बऱ्याचवेळा असतो. अमूल गोल्ड दूध (१ लिटर) : स्टोअर ८२ रुपये, अॅपवर ७८ रुपये (सबस्क्रिप्शन डिस्काउंटसह), भाज्या-फळे : अॅपवर सकाळी ७ ते १० दरम्यान ऑर्डर केल्यास १०-१५% जास्त स्वस्त असतात असे म्हटले जाते.

3 / 5
डीमार्ट स्टोअरचे अनेक फायदे आहेत. समोरासमोर माल तपासता येतो आणि एक्स्पायरी डेट पाहता येते, मोठ्या प्रमाणात खरेदी करून ताबडतोब घरी आणता येते, २००० रुपयांपेक्षा जास्त बिल असल्यास काही शहरांत मोफत होम डिलिव्हरी मिळते, जुन्या ग्राहकांसाठी स्टोअरमध्येच ‘बाय मोअर सेव्ह मोअर’ स्क्रॅच कार्ड्स असतात

4 / 5
डीमार्ट रेडी अॅपचे देखील फायदे आहेत. दररोज सकाळी १० वाजता फ्लॅश सेल असल्याचे म्हटले जाते, पहिल्या ऑर्डरवर ४९९ रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर १५० रुपये सूट + एक महिना फ्री डिलिव्हरी पिक-अप पॉइंट पर्याय वापरल्यास अतिरिक्त ३-५% सूट, सबस्क्रिप्शन प्लॅन (दरमहा ९९ रुपये) घेतल्यास दूध-भाजीवर १०-२०% हमखास बचत होते.

5 / 5
छोट्या-मोठ्या रोजच्या खरेदीसाठी डीमार्ट रेडी अॅप थोडेसे स्वस्त पडते, विशेषतः ज्यांना दररोज डिलिव्हरी हवी आहे किंवा फ्लॅश सेलचा फायदा घ्यायचा आहे. मात्र मोठी महिन्याची खरेदी आणि माल तपासून घ्यायचा असेल तर ऑफलाइन स्टोअरच उत्तम पर्याय आहे. दोन्ही ठिकाणी किंमतीत फरक फक्त ३ ते ८% इतकाच असतो. शिवाय दोन्ही ठिकाणी डीमार्टची ‘लोवेस्ट प्राइस गॅरंटी’ लागू आहे. त्यामुळे कुठूनही खरेदी केली तरी जास्त पैसे देण्याची वेळ येत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us