
वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले गेले आहे. घर बांधताना आणि सजवताना काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काही वस्तू असणं शुभ मानलं जात नाही. या वस्तू कोणत्या ते जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कोणताही दगड किंवा खांब नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे कामात अडचणींचा डोंगर उभा राहतो. तसेच घरात कलह निर्माण होतो.

घराच्या मुख्य दरवाज्यासमोर तुटलेल्या वस्तू असणं शुभ मानलं जात नाही. कचरा किंवा घाण नसावी. अन्यथा घरात नकारात्मक उर्जेचा वास होतो. घरासमोर चिखल किंवा पाणी साचलेलं नसावं. यामुळे कुटुंबातील सदस्यांचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

घराच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर विजेचा खांब नसावा. यामुळे कुटुंबात भांडणं किंवा वाद होण्याची शक्यता असते. आर्थिक फटका बसतो तसेच पैशांची बचत करणं कठीण होते.

घराच्या मुख्य दरवाज्यासमोर झाडं झुडपं नसावीत. यामुळे कुटुंबाच्या प्रगतीत अडथळे येतात. वाळलेली किंवा काटेरी झाडे असतील नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात.