
श्रावण महिन्यात महादेवाची पूजा केली जाते. मात्र पूजा करताना काही खास बाबी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टी चुकूनही अर्पण करून नये. या गोष्टी अर्पण करणे अशूभ मानले जाते.

भगवान महादेवाची हळदीने पूजा करू नये. हळद ही सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. मात्र महादेव हे वैराग्य आणि त्यागाचे प्रतिक आहे. त्यामुळेच शिवलिंगाला हळद कधीच लावू नये असे म्हटले जाते.

शिवलिंगाला कुंकू कधीच लावू नये, असे सांगितले जाते. कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक आहे. तर महादेव हे वैरागी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच शिवलिंगाची कुंकू लावून कधीच पूजा करू नये, असे सांगितले जाते.

शिवलिंगाला तुळशीची पानेदेखील कधीच अर्पण करू नये असे सांगितले जाते. पुराणानुसार शिवलिंगावर तुलशीची पाने चढवणे चुकीचे मानले जाते.

शिवलिंगाला नेहमी न तुटलेले तांदळाचे दानेच अर्पण करावेत असे म्हटले जाते. तुकडे झालेले, तुटलेला तांदूळ घेऊन शिवलिंगाची पूजा करू नये. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)