
अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत शिल्पाच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी एकेकाळी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. दोघांनी त्यांच्या नात्यावर स्पष्टीकरण देखील दिलं होतं.

अभिनेता सलमान खान याच्यासोबत देखील शिल्पाच्या नावाच्या चर्चांनी जोर धरला होता. 90 च्या दशकात दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. दरम्यान, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत... सलमान कायम घरी यायचा पण आम्ही कधीच डेटवर गेलो नाही... असं देखील अभिनेत्री म्हणाली.

उद्योजक विजय माल्यायाच्यासोबत देखील शिल्पा शेट्टी हिचं नाव जोडलं गेलं. पण यावर अभिनेत्रीने कधीच अधिकृत स्पष्टीकरण दिलं नाही.

शिल्पाचं नाव हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गियरशीही जोडलं गेलं. 2007 मध्ये रिचर्डने एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान शिल्पाला सर्वांसमोर किस केलं होतं. ज्यामुळे दोघांनाही खूप ट्रोल करण्यात आलं. पण त्यानंतर रिचर्ड याने अभिनेत्रीची माफी मागितली.

अखेर अभिनेत्री राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केलं. शिल्पा ही राज याची दुसरी पत्नी आहे. राज - शिल्पा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अभिनेत्री कायम कुटुंबासोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.