
एक्सिओम मिशन 4 काही कारणास्तव स्थगित करण्यात आलं आहे. पण अंतराळात जेवण खराब होतं की नाही? असा प्रश्न समोर येत आहे. कारण भारतीय वायुसेना पायलट आणि अंतराळवीर यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला मिशनसाठी आमरस, मूग आणि गाजर हलवा नेण्याच्या तयारी होता. पण अंतराळात या वस्तू खराब होत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (फोटो: Pixabay)

अवकाशात अन्न खराब होण्याची प्रक्रिया पृथ्वीवर असते तशी नसते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तिथलं वातावरण वेगळं आहे. अवकाशात शून्य दाब असून हवाच नाही. जीवाणू आणि बुरशी ऑक्सिजनशिवाय जगूच शकत नाही. यामुळेच अन्न कुजतं. अंतराळयान पूर्णपणे सील असते त्यामुळे हवा हात पोहोचू शकत नाही. (फोटो: Pixabay)

जेव्हा अन्नाचं ऑक्सिडायझेशन होत नाही आणि तापमानाचा परिणाम होत नाही तेव्हा अन्न बराच काळ सुरक्षित राहू शकतं. पण अन्न नेहमीच खाण्यायोग्य राहील की नाही हे सांगणं कठीण आहे. (फोटो: Pixabay)

प्रामुख्याने दोन प्रकारचं अन्न अवकाशात नेलं जातं. पहिलं म्हणजे फ्रीज ड्रायिंग अन्न.. कारण या अन्नातून आधीच पाणी काढून टाकलेलं असतं. त्यामुळे यात बॅक्टेरिया वाढू शकत नाही. दुसरं रेडी टू ईट फूड्स.. हे शिजवल्यानंतर बॅक्टेरिया मरून जातात. (फोटो: Pixabay)

अंतराळात जेवण कधी खराब होतं ते जाणून घेऊयात. जर खाण्याची पॅकिंग व्यवस्थित नसेल आणि लीक असेल. तसेच तापमान नियंत्रित करताना चूक झाली किंवा मिशन लांबलं, तर खराब होऊ शकतं. (फोटो: Pixabay)