Donald Trump Tariffs : जगाची चिंता वाढली, भारताविषयी ट्रम्प असं बोलून गेले की…टॅरिफने सगळेच…

| Updated on: Sep 18, 2025 | 10:37 PM
1 / 6
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलेला आहे. या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना भारताविषयी मोठे विधान केले आहे.

2 / 6
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ता शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना ट्रम्प यांनी मोदींचा मित्र असा उल्लेख केला. तर मोदी यांनीदेखील ट्रम्प यांना मित्र म्हणत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. असे असतानाच आता ट्रम्प यांनी भारताविषयी केलेल्या नव्या विधानाची चर्चा होत आहे.

3 / 6
ट्रम्प यांनी ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना युरोपीय देशांवर टीका केली. युरोपीय देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी करत आहेत. मी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खूप जवळ आहे, असे ट्रम्प म्हणाले.

4 / 6
तसेच, मी अलिकडेच त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी आणि माझ्याच खूप चांगले संबंध आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे की मी त्यांच्यावरही टॅरिफ लावला आहे, असेही ट्रम्प भारताविषयी म्हणाले. तसेच सध्या चीनदेखील अमेरिकेला मोठ्या प्रमाणात टॅरिफ देत आहे, असा उल्लेख करायलाही ते विसरले नाहीत.

5 / 6
मी अजूनही काही निर्णय घेऊ शकतो. मात्र मी ज्यांच्यासाठी लढत आहे, त्यांच्याविरोधात मला अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे नाहीत. तेलाची किंमत कमी झाली तर रशिया समेट घडवून आणायला तयार होईल, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. युरोपीय देशांकडून रशियाकडून तेल खरेदी केले जात आहे. ही तेलखरेदी कमी करावी असे ट्रम्प यांना सूचवायचे होते.

6 / 6
त्यामुळे आता ट्रम्प यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय आहे, असे विचारले जात आहे. ट्रम्प वारंवार भारत आणि भारतावर लादलेला टॅरिफ याचा उल्लेख करत आहेत. त्यामुळे ते भविष्यात आणखी एखादा निर्णय घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.