Donald Trump : जीव वाचवण्यासाठी ट्रम्प यांचा सिक्रेट प्लॅन, सोबत असते चालते फिरते बंकर; तुम्हीही व्हाला थक्क!

डोनाल्ड ट्रम्प हे एका महासत्ता देशाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्यास जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच त्यांच्यासोबत चालते-फिरते एक बंकर असते.

| Updated on: Sep 17, 2025 | 8:53 PM
1 / 5
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जगातील सर्वोच्च नेत्यांपैकी एक आहेत. एका महसत्ता देशाचे ते प्रमुख असल्याने त्यांचे वेगळे असे महत्त्व आहे. परदेश दौऱ्यावदरम्यान ते आपल्यासोबत त्यांची आवडती कार द बिस्ट घेऊन जातात. इतर देशातही ते याच कारने प्रवास करतात. म्हणणूनच ही कार कायम चर्चेचा विषय असते.

2 / 5
सध्या डोनाल्ड ट्रम्प ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते आपल्यासोबत त्यांची द बिस्ट नावाची ही कार घेऊन गेले आहेत. ते ब्रिटनमध्ये याच कारने प्रवास करतील. या कारला जगातील सर्वाधिक सुरक्षित कार मानले जाते. ही कार फारच विशेष आहे. कोणत्याही रासायनिक हल्ल्याचा या कारवर काहीही परिणाम होत नाही. या कारवर बॉम्ब जरी टाकला तरी तिला काहीच होत नाही, असे सांगितले जाते. या कारमध्ये असलेली व्यक्ती नेहमीच सुरक्षित असते.

3 / 5
कोणताही हल्ला झाला की लोक बंकरमध्ये लपतात. ही कारदेखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी एका बंकरप्रमाणेच काम करते. म्हणूनच ट्रम्प यांच्या कारला चालते-फिरते बंकर म्हटले जाते. या कारचे वजन साधारण 9072 किलो असल्याचे म्हटले जाते. या कारची किंमत 1.5 दशलक्ष डॉलर्स आहे.

4 / 5
या कारमध्ये नाईट व्हिजन यंत्रणा आहे. यासह या कारमध्ये अश्रुधुराचा हल्ला करण्याचीही यंत्रणा आहे. विशेष म्हणजे या कारच्या दरवाजांत विद्युत प्रवाहही सोडता येतो. या कारमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी आणीबाणीच्या काळात रक्तदेखील ठेवलेले असते. तसेच अनेक जीवनरक्षक उपकणेही या कारमध्ये आहेत.

5 / 5
या कारमध्ये स्मोक स्क्रीन, ऑईल स्किल्स, शॉटगन, रॉकेट ग्रॅनेडही आहेत. आपत्कालीन स्थितीत या कारमध्ये ऑक्सिजन टँकही असतो. डोनाल्ड ट्रम्प यांचाया कारमध्ये एकावेळी सात जणांना बसता येते. द बिस्ट या कारचे चाकदेखील फार विशेष असतात. बंदुकीची गोळी मारली तरी या कारच्या टायर्सना काहीही होत नाही.