
अनेक लोक सकाळची सुरूवात एक ग्लास कोमट पाण्याने करतात. कोमट पाणी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात असे सांगितले जाते. मात्र, असे असले तरीही ते धोकादायक देखील आहे.

रिकाम्या पोटी पाणी पिण्याची सवय अनेक आरोग्यदायी फायदे देणारी मानली जाते, परंतु ती प्रत्येकासाठी योग्य नाही. तुम्हाला जर दाताचे आजार असतील तर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे टाळा.

बरेच लोक दात साफ न करता देखील पाणी पितात. यामुळे थेट बॅक्टेरिया आपल्या पोटात जातात. सकाळी यामुळे सर्वात अगोदर ब्रश करून घ्या.

एकदम गरम पाणी सकाळी पिणे टाळा. कारण आताड्यांवर त्याचा वाईट परिणाम हा होऊ शकतो. शक्यतो कोमट पाणी पिणे ठीक आहे.

बऱ्याचदा सकाळी पालक हे मुलांना देखील कोमट पाणी पिण्यास देतात. मात्र, त्यांच्या आरोग्यासाठी ते नक्की चांगले नाही. कोमट पाण्यात लिंबू टाकून पिणे अधिक फायदेशीर.