Drishyam 3: ‘दृश्यम 3’ची नंदिनी साळगावकर खऱ्या आयुष्यात कोट्यवधींची मालकीण; नेटवर्थ ऐकून बसेल धक्का!

Drishyam 3: 'दृश्यम' फ्रँचायजीमध्ये विजय साळगावकरची पत्नी नंदिनी साळगावकरची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रिया सरन खऱ्या आयुष्यात कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. तिच्याकडे आलिशान गाड्यांचंही कलेक्शन आहे.

| Updated on: Oct 04, 2026 | 10:45 AM
1 / 6
Drishyam 3: अजय देवगणच्या ‘दृश्यम’ फ्रँचायझीमधील नंदिनी साळगावकर हे पात्र अभिनेत्री श्रिया सरनने प्रभावीपणे साकारलं आहे. ‘दृश्यम 3’मुळे श्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिच्या अभिनयासोबतच तिची लाइफस्टाइल, घर, पती आणि संपत्तीबाबतही जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Drishyam 3: अजय देवगणच्या ‘दृश्यम’ फ्रँचायझीमधील नंदिनी साळगावकर हे पात्र अभिनेत्री श्रिया सरनने प्रभावीपणे साकारलं आहे. ‘दृश्यम 3’मुळे श्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिच्या अभिनयासोबतच तिची लाइफस्टाइल, घर, पती आणि संपत्तीबाबतही जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

2 / 6

दोन दशकांहून अधिक काळ मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या श्रियाने हिंदीसोबतच तेलुगू, तमिळ आणि इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रिया सरनची एकूण संपत्ती सुमारे 80 कोटी रुपये असल्याचं समजतंय. अभिनयासोबतच ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर व्यावसायिक कामांमधूनही तिची कमाई होते.

3 / 6

श्रिया सरनने तिच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. ती एका चित्रपटासाठी साधारण 3 ते 4 कोटी रुपये मानधन घेत असल्याचं कळतंय. ‘दृश्यम’, ‘RRR’ आणि ‘शिवाजी: द बॉस’सारख्या चित्रपटांमुळे श्रियाची लोकप्रियता देशभर वाढली.

4 / 6

श्रिया सरन मुंबईतील एका सुंदर अपार्टमेंटमध्ये पती आंद्रेई कोशचीव आणि मुलगी राधासोबत राहते. आंद्रेई हा रशियन टेनिसपटू आणि उद्योजक आहे. श्रियाच्या घराच्या इंटेरिअरमध्ये आधुनिकतेसोबत भारतीय संस्कृतीची झलक दिसते. श्रिया सरनकडे एकापेक्षा एक आलिशान कारदेखील आहेत.

5 / 6

तिच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी A6, मर्सिडीज-बेंझ GLE, फोर्ड इकोस्पोर्ट आणि BMW 7 Series यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Audi A6 ची किंमत सुमारे 65 लाख, Mercedes-Benz GLE जवळपास 1 कोटी, Ford EcoSport सुमारे 12 लाख, तर BMW 7 Seriesची किंमत जवळपास 1.7 कोटी रुपये आहे.

6 / 6

2001 मध्ये तेलुगू चित्रपट ‘इष्टम’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या श्रियाने ‘संतोषम’, ‘शिवाजी: द बॉस’, ‘दृश्यम’ आणि ‘RRR’सह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. ती प्रशिक्षित कथक नृत्यांगनाही आहेत. आता ‘दृश्यम 3’मधील तिच्या भूमिकेमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us