Drishyam 3: ‘दृश्यम 3’ फेम गायतोंडेची पत्नी दिसते खूपच सुंदर; कठीण काळात पतीला दिली अशी साथ
Drishyam 3: कमलेश सावंत हे मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते आहेत. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘दृश्यम’ चित्रपटातील पोलीस अधिकारी गायतोंडे या भूमिकेमुळे त्यांना देशभरात ओळख मिळाली.

‘दृश्यम’ चित्रपटातील गायतोंडे ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. अभिनेता कमलेश सावंत यांनी आपल्या दमदार अभिनयाने या व्यक्तिरेखेला वेगळी ओळख मिळवून दिली. सध्या ‘दृश्यम 3’मुळे कमलेश सावंत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, त्यांच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
कमलेश यांच्या व्यावसायिक प्रवासात त्यांच्या पत्नीची महत्त्वाची साथ राहिली आहे. अभिनय क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अनेकदा कलाकारांना अनिश्चितता, आर्थिक चढ-उतार आणि कामाच्या संधींची वाट पाहावी लागते. अशा परिस्थितीत कुटुंबाची साथ कलाकारासाठी मोठा आधार ठरते. कमलेश यांच्या आयुष्यातही पत्नीची साथ मोलाची आहे.
कमलेश सावंत यांच्या पत्नीचं नाव सपना सावंत आहे. त्या फायनान्शियल एडव्हायजर म्हणून काम करतात. त्या सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहेत. कमलेश आणि सपना यांना एक मुलगा आहे. कमलेश यांच्या तारखा आणि इतर गोष्टीसुद्धा त्याच सांभाळतात.
कमलेश सावंत यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील आर्थिक अडचणींबद्दल भाष्य केलं होतं. काम केल्यानंतरही काही निर्मात्यांकडून पैसे मिळाले नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला. आतापर्यंत त्यांचे जवळपास 70 लाख रुपये बुडाले आहेत.
कमलेश सावंत यांच्या पत्नीने त्यांच्या प्रवासात दिलेली साथ त्यामुळे महत्त्वाची ठरते. ‘दृश्यम 3’मुळे त्यांची लोकप्रियता पुन्हा वाढली असली, तरी या यशामागे अनेक वर्षांचा संघर्ष आणि मेहनत आहे. पडद्यावर गायतोंडे म्हणून भाव खाणाऱ्या कमलेश सावंत यांच्या या प्रवासाची दुसरी बाजूही चाहत्यांना भावणारी आहे.