Drishyam: ‘दृश्यम’चा सॅम आठवतोय? अचानक चित्रपटांपासून का झाला दूर? दोन वर्षांपासून एकही भूमिका नाही

Drishyam: अजय देवगणच्या 'दृश्यम' या चित्रपटातील सॅम तुम्हाला आठवतोय का? पहिल्या भागात त्याची अत्यंत छोटी पण महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर संपूर्ण कथा त्याच्याभोवतीच फिरते. तो सध्या कुठे आहे आणि काय करतोय, त्याबद्दल जाणून घ्या..

| Updated on: Oct 06, 2026 | 11:42 AM
1 / 7
Drishyam: अजय देवगणच्या ‘दृश्यम’ या चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे सॅम अर्थात समीर देशमुख. हा मुलगा कथेत फार काळ दिसत नसला, तरी त्याच्यामुळेच संपूर्ण कथा पुढे सरकते. सॅमची भूमिका अभिनेता ऋषभ चड्ढा याने साकारली होती.

Drishyam: अजय देवगणच्या ‘दृश्यम’ या चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे सॅम अर्थात समीर देशमुख. हा मुलगा कथेत फार काळ दिसत नसला, तरी त्याच्यामुळेच संपूर्ण कथा पुढे सरकते. सॅमची भूमिका अभिनेता ऋषभ चड्ढा याने साकारली होती.

2 / 7

‘दृश्यम 3’च्या निमित्ताने पुन्हा एकदा या व्यक्तिरेखेची चर्चा सुरू झाली असून, ऋषभ चड्ढा सध्या काय करतो, याबद्दलही चाहत्यांना उत्सुकता आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’मध्ये सॅमची व्यक्तिरेखा नकारात्मक छटेची होती. अंजूशी गैरवर्तन केल्यानंतर त्यांच्यात वाद होतो आणि या संघर्षात अंजूकडून सॅमच्या डोक्यात रॉड लागतो. त्याचा मृत्यू झाल्यानंतर विजय साळगावकर आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याचा मृतदेह लपवतो. यानंतर संपूर्ण ‘दृश्यम’ची कथा या घटनेभोवती फिरते.

3 / 7

ऋषभ चड्ढाचा जन्म 1994 मध्ये मुंबईत झाला. त्याने 2007 मध्ये अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. मोठ्या पडद्याबरोबरच त्याने टेलिव्हिजन आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. ‘दृश्यम’पूर्वी तो सोनम कपूर आणि फवाद खान यांच्या ‘खूबसूरत’मध्ये दिसला होता. त्यानंतर ‘लुप्त’सह काही प्रोजेक्ट्समध्येही त्याने भूमिका केल्या.

4 / 7

ऋषभने बालकलाकार म्हणून आणि तरुण अभिनेता म्हणून अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले. ‘बेस्ट ऑफ लक निक्की’, ‘द सूट लाइफ ऑफ करण अँड कबीर’ आणि ‘आदत से मजबूर’ यांसारख्या मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. याशिवाय त्याने वेब विश्वातही काम केलं असून ‘डिवोर्स के लिए कुछ भी करेगा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसला होता.

5 / 7

‘दृश्यम’नंतर ऋषभने काही प्रोजेक्ट्समध्ये काम केलं असलं तरी गेल्या दोन वर्षांपासून त्याने कोणताही नवीन अभिनय प्रोजेक्ट साइन केलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याचा अर्थ त्याने मनोरंजन क्षेत्र सोडलं असा नाही. सध्या तो लाइव्ह स्टोरीटेलिंग आणि पोएट्री कार्यक्रमांमधून प्रेक्षकांशी थेट संवाद साधत आहे.

6 / 7

‘मॉडर्न मजनू’ या त्याच्या लाइव्ह शोमधून तो आपली वेगळी कलात्मक बाजू प्रेक्षकांसमोर आणत आहे. म्हणजेच ‘दृश्यम’मधील सॅमची भूमिका ऋषभच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरली असली, तरी त्याचा कलात्मक प्रवास केवळ सिनेमांपुरता मर्यादित राहिलेला नाही.

7 / 7

अभिनयापासून काही काळ दूर राहून त्याने थेट प्रेक्षकांसमोर कथा आणि कविता सादर करण्याचा मार्ग निवडला आहे.या लाइव्ह शोजच्या माध्यमातून तो थेट प्रेक्षकांशी जोडलेला आहे. त्याच्या शोजची तिकिटं विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून बुक केले जाऊ शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us