चिडलेल्या बायकोला किंवा गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी खास गाणं, ऐकताच क्षणात होईल रुसवा खत्म

पावसाळ्यातील सर्वात लोकप्रिय 68 वर्षांपूर्वीचं गाणं. जे रुसलेल्या गर्लफ्रेंड आणि बायकोला ऐकवलंत तर काही सेकंदात जाईल तिचा रुसवा. तुम्ही ऐकलं का?

| Updated on: Jul 27, 2026 | 2:16 PM
1 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक गाणी अशी आहेत, जी गेल्या 50 वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये दिग्गज गायक किशोर कुमार यांनी गायलेली अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यापैकीच एक गाणं जे तब्बल 68 वर्षांनंतरही पावसाळ्यात आवर्जून ऐकले जाते.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक गाणी अशी आहेत, जी गेल्या 50 वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये दिग्गज गायक किशोर कुमार यांनी गायलेली अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यापैकीच एक गाणं जे तब्बल 68 वर्षांनंतरही पावसाळ्यात आवर्जून ऐकले जाते.

2 / 5

हे गाणे 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘चलती का नाम गाड़ी’ या चित्रपटातील आहे. या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले असून, दिग्गज संगीतकार एस. डी. बर्मन यांनी त्याला संगीत दिले आहे. किशोर कुमार यांच्या खट्याळ आणि मनमोहक आवाजामुळे हे गाणे अजरामर ठरले.

3 / 5

या गाण्याचे बोल आहेत, ‘एक लड़की भीगी भागी सी’. चित्रपटात हे गाणे अभिनेत्री मधुबाला यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. कथेनुसार मुसळधार पावसात मधुबालाच्या पात्राची कार बंद पडते. ती कार दुरुस्तीसाठी मेकॅनिकच्या गॅरेजमध्ये आणते.

4 / 5

मेकॅनिकची भूमिका साकारणारे किशोर कुमार कार दुरुस्त करताना तिच्यासाठी ‘एक लड़की भीगी भागी सी, सोती रातों में जागी सी...’ हे रोमँटिक गाणं गातात. या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री आणि हलकाफुलका अंदाज आजही प्रेक्षकांना मोहून टाकते.

5 / 5

रोमँटिक शब्द, मधुर संगीत आणि किशोर कुमार यांच्या अविस्मरणीय गायकीमुळे हे गाणे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन लोकप्रिय गाण्यांपैकी एक बनले आहे. आजही हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि सदाबहार रोमँटिक मान्सून गाण्यांपैकी एक मानले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us