Eknath Shinde : ऑपरेशन टायगर आधीच एकनाथ शिंदेंना बसू शकतो झटका, नाराज शायना एनसी या पक्षात करु शकतात प्रवेश

Eknath Shinde : राजकारणात कधी काय घडेल, याचा नेम नसतो. जे वाटत नाही, अपेक्षा नसते अशा गोष्टी घडतात. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एक प्रमुख महिला नेत्या नाराज असल्याची चर्चा आहे.

| Updated on: May 06, 2026 | 11:43 AM
1 / 5
 एकनाथ शिंदे लवकरच ऑपरेशन टायगर करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार, खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. पण त्याआधी एकनाथ शिंदे यांनाच राजकीय धक्का बसू शकतो.

2 / 5
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. विधान परिषदेसाठी त्यांचा विचार न झाल्यामुळे त्या नाराज असण्याची शक्यता आहे. पक्षाकडून आपल्याला विधान परिषदेवर संधी मिळेल असं त्यांना वाटलं होतं.

3 / 5
शायना एनसी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

4 / 5
शायना एनसी या मूळच्या भाजपच्या आहेत. भाजपमधून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

5 / 5
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शायना एनसी यांना मुंबादेवीतून विधानसभेचं तिकिट देण्यात आलं होतं. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून डिबेट शो मध्ये त्या शिवसेनेची बाजू मांडताना दिसायच्या.

Follow Us