कोणकोणत्या इलेक्ट्रॉनिक सामानात असतं सोनं? तुमच्या घरातही आढळेल..

तुमच्याही घरातल्या विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सोनं आढळेल, असं तुम्हाला सांगितल्यास त्यावर विश्वास बसेल का? पण हे खरंय.. सोन्याच्या एका विशिष्ट गुणधर्मामुळे त्याचा वापर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये काहीशा प्रमाणात केला जातो.

| Updated on: Apr 18, 2025 | 2:49 PM
1 / 7
सोनं हे नाव ऐकताच अत्यंत महागडा धातू हेच आपल्या लक्षात येतं. सोन्याच्या किंमती दरवर्षी वाढतच आहेत. असं असूनही सोन्याच्या दागिन्यांची हौस मात्र अनेकजण आवर्जून पूर्ण करतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की तुमच्या घरातील काही जुन्या इलेक्ट्रॉनिक सामानातही सोनं असू शकतं?

2 / 7
गंज चढत नसल्याच्या गुणधर्मामुळे सोन्याचा वापर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये केला जातो. जर तुमच्या घरात कम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल, तर त्यातही सोनं असतंच.

3 / 7
CPU (प्रोसेसर), रॅम, मदरबोर्ड, ट्रान्सिस्टर आणि कनेक्शन पिन्समध्ये अत्यंत बारिक थराच्या स्वरुपात सोन्याचा वापर केला जातो.

4 / 7
प्रोफेशनल स्क्रॅप डीलर या भागांमधून मायक्रो लेव्हलला सोनं काढतात. जुन्या काळात टीव्ही आणि कम्प्युटर मॉनिटरवर लागलेल्या सर्किट बोर्डला बनवतानाही सोन्याचा वापर व्हायचा.

5 / 7
प्रत्येक घरात असलेल्या रिमोट कंट्रोलमधील प्रिंटेड सर्किट बोर्डमध्ये (PCB) सोन्याचे अत्यंत बारिक कण असतात. उत्तम सिग्नल ट्रान्समिशनसाठी हे वापरलं जातं.

6 / 7
1980 आणि 1990 च्या दशकात बनलेल्या स्टिरिओ सिस्टम, कॅसेट प्लेअर आणि टेप रेकॉर्डर यांच्यातही सोन्याचा वापर व्हायचा. त्याकाळी उपकरणांच्या गुणवत्तेसाठी सोन्याचा वापर अनिवार्य समजला जायचा. परंतु आधुनिक सिस्टमध्ये हा वापर बराच कमी झाला आहे.

7 / 7
जुन्या काळाचे रेडिओ, विशेषकरून शॉर्टवेव रेडिओ.. जे आजकाल फार क्वचित पहायला मिळतात, त्यांच्यातही सोन्याचा वापर व्हायचा. यांच्या सर्किटमध्ये वापरले गेलेले भाग सोन्याच्या मायक्रो कोटिंगपासून तयार केले जायचे.