
गेल्या काही दिवसांपासून जेफ्री एपस्टीन हे नाव जगभरात पुन्हा-पुन्हा चर्चेत येत आहे. जेफ्री एपस्टीन हा लैंगिक गुन्ह्यातील दोषी होता. त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला होता. दरम्यान, अमेरिकेच्या न्याय विभागाकडून एपस्टीनशी संबंधित व्हिडीओ, फोटो, ऑडिओ आणि कागदपत्रे सार्वजनिक करण्यात येत आहेत. (फोटो सौजन्य- एक्स)

याच सर्व दस्ताऐवजांना एपस्टीन फाईल्स म्हटले जात असून या दस्तऐवजांनी खळबळ उडवून दिली आहे. एपस्टीन फाईल्समधील समोर आलेले फोटो तसेच व्हिडीओंमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. यातील काही फोटोंमध्ये एपस्टीन हा अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अब्जाधीश बिल गेट्स, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासोबत दिसत आहे.

एपस्टीन याचे महिला तसेच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्याचे वेगळे मॉडेल होते. एपस्टीन याचा एक प्रायव्हेट आयलँड होता. या आयलँडवर सामान्य लोकांना जण्यास परवानगी नसायची. एपस्टीन या आयलँडवर पार्टीसाठी यायचा.

त्याने आयजित केलेल्या पार्टीमध्ये दिग्गज लोक सामील व्हायचे. याच आयलँडवर मुलींची शोषण केले जायचे, असा सांगितले जाते. या आयलँडचे हे फोटो आता समोर आले आहेत. या फोटोंना पाहून एपस्टीनने या आयलँडवर कशा सुविधा निर्माण केल्या होत्या, त्याची प्रचिती येत आहे.

या आयलँडवरील घरात स्विमिंग सर्व सुखसोई होत्या. आलिशान घर, मखमली पलंग तसेच इतर अनेक सुविधा या आयलँडमधील घरात होत्या. एपस्टीन फाईल्समध्ये या आयलँडचे सर्व फोटो देण्यात आलेले आहेत. तसेच काही व्हिडीओदेखील उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य- एक्स)