
द्वितीय क्रमांकाचा मान :या स्पर्धेत मोठ्या गटात परभणीच्या नसीम अन्सारी यांच्या जासूस अश्वाने व्दितीय क्रमांक पटकावला . तर लहान गटात अहमदपूरच्या सय्यद खैराती यांच्या वीर अश्वाने व्दितीय क्रमांक पटकावला ,या अश्व स्पर्धा लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आल्या होत्या .

बुलेट अन् बाहुबली प्रथम : मोठ्या गटात अंबाजोगाई येथील हुसेन गवळी यांचा बुलेट नावाचा अश्व प्रथम आला आहे . तर लहान गटात बेलकुंडच्या विष्णू कोळी यांचा बाहुबली हा अश्व प्रथम आला आहे .

दोन गटांमध्ये स्पर्धा : अश्वदौड स्पर्धेमध्ये दोन गट करण्यात आले होते. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यासह लगतच्या बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 35 अश्वांनी सहभाग नोंदवला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वाला एक वेगळेच महत्व असून त्यांच्या तिथीनुसार होणाऱ्या जयंती निमित्त या स्पर्धा पार पडल्या.

बेलकुंड शिवारात स्पर्धा : औसा तालुक्यातील बेलकुंड शिवारात या अगळ्या-वेगळ्या स्पर्धा पार पडल्या. यावेळी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. शिवाय नियम-अटींचे पालन करुन शिव भक्तांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.