
बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी हिचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिलेले आहे. धर्मेंद्र यांचे अगोदरच लग्न झालेले असताना हेमा मालिनी यांनी त्यांच्याशी लग्न केले.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या दोन मुली आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक ईशा हिने तिच्या पुस्तकामध्ये मोठा खुलासा केलाय.

ईशा म्हणाली की, मला चाैथीमध्ये असताना कळाले की, मला दोन आई आहेत. शाळेत असताना एका मुलाने चिडवले होते की, मला दोन आई आहेत.

त्यावेळी मी त्याला रागात बोलले की, मला एकच आई आहे. त्यानंतर मी घरी घेऊन माझ्या आईला विचारले. त्यावेळी तिने देखील मला दोन आई असल्याची गोष्ट सांगितले नाही.

आता या गोष्टी नॉर्मल आहेत. मात्र, त्यावेळी हे नॉर्मल अजिबातच नव्हते. मात्र, मला जेंव्हा कळाले की, माझ्या वडिलांचे अगोदरच एक कुटुंब आहे तर मला फार काही दु:ख झाले नाही.