या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी

शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत काँग्रेसचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

| Updated on: Sep 05, 2023 | 3:45 PM
1 / 5
धुळे जिल्ह्यात अपेक्षित असा पाऊस न पडल्याने धुळ्यातील पिकांची अवस्था वाईट झाली आहे. गेल्या अडीच महिन्यापासून पावसाने धुळे जिल्ह्याकडे पाठ फिरवली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.

2 / 5
धुळ्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला आहे खरीप हंगामातील पिकं पूर्णतः करपली असून जवळपास दीड ते दोन महिन्यापासून पावसाचा थेंबही पडला नाही.

3 / 5
 त्यामुळे या हंगामात येणारी सर्व पीक ही करपली आहेत प्रतिकूल परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना पिक विमा ची अग्रीम रक्कम पातळीने द्यावी मात्र तसे होताना दिसत नाही दुसरीकडे मात्र कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात अग्रीम रक्कम जमा करण्यात आली आहे.

4 / 5
 मात्र धुळ्यात अद्यापही रक्कम जमा झालेली नाही जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना पिक विमा कंपनीला अग्रीम विमा रक्कम देण्याच्या सूचना कराव्यात जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चाऱ्याच्या छावण्या उभारून पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करत आज काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.

5 / 5
याप्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते जर दुष्काळ लवकर जाहीर केला नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी दिला.

Follow Us