
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते '8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी!' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शनिवारी क्लॅप देण्यात आला.

उत्तम स्टारकास्ट आणि महत्त्वाचा विषय असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण पुण्यात सुरू करण्यात आलं आहे.

विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर चित्रपटाची पटकथा शर्वाणी पिल्लई आणि सुश्रुत भागवत यांनी लिहिली आहे

अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री गेस्ट कलाकार असणार आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपटाच्या मुहुर्ताचा क्लॅप देऊन चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.