38 वर्षांची फ्लॉप अभिनेत्री, प्लेबॉय मॅगझिनसाठी केलं निर्वस्त्र फोटोशूट, एका रात्रीत बनली स्टार, आज सोशल मीडियावर तिचीच होते चर्चा

बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री जिने दिले अनेक फ्लॉप चित्रपट, पण एका निर्वस्त्र फोटोशूटमुळे एका रात्रीत बनली स्टार. आता तिच्या बोल्ड लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत.

| Updated on: Feb 11, 2026 | 12:22 PM
1 / 8
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांना चित्रपटांमधील यशापेक्षा त्यांच्या बोल्ड अंदाजामुळे जास्त ओळख मिळाली. अभिनयाच्या बाबतीत फार मोठी छाप पाडता आली नाही. मात्र, ग्लॅमर, आत्मविश्वास आणि बेधडक शैलीमुळे त्या सातत्याने चर्चेत राहिल्या.

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांना चित्रपटांमधील यशापेक्षा त्यांच्या बोल्ड अंदाजामुळे जास्त ओळख मिळाली. अभिनयाच्या बाबतीत फार मोठी छाप पाडता आली नाही. मात्र, ग्लॅमर, आत्मविश्वास आणि बेधडक शैलीमुळे त्या सातत्याने चर्चेत राहिल्या.

2 / 8

अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शर्लिन चोप्रा. वयाच्या 38व्या वर्षीही शर्लिन आपल्या फिटनेस, स्टाइल आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वामुळे नव्या पिढीतील अभिनेत्रींसोबत सहज स्पर्धा करताना दिसते.

3 / 8

चित्रपटसृष्टीत अपेक्षित यश जरी मिळालं नसलं तरी लाईमलाईटपासून दूर राहणं शर्लिनला कधीच मान्य नव्हतं. याच कारणामुळे तिच्या आयुष्यात एक असा क्षण आला, ज्याने तिच्या करिअरची दिशा बदलून टाकली. इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर दिलेल्या एका ग्लॅमरस फोटोशूटमुळे ती रातोरात चर्चेत आली.

4 / 8

प्लेबॉय मॅगझिनसाठी केलेलं हे फोटोशूट तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरलं आणि तिला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. इंडस्ट्रीत जिथे दमदार अभिनय आणि मुख्य भूमिका यांना महत्त्व दिलं जातं, तिथे काही मॉडेल्स आणि बोल्ड अभिनेत्रीांनी त्यांच्या वेगळ्या प्रतिमेमुळे स्वतःची खास ओळख निर्माण केली.

5 / 8

हटके सादरीकरण, बेधडक विचारसरणी आणि बोल्ड लुकमुळे या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा मिळवली. याच यादीत शर्लिन चोप्राचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. आज 11 फेब्रुवारी रोजी ती तिचा 38वा वाढदिवस साजरा केला.

6 / 8

बॉलिवूडमध्ये शर्लिनने 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टाइम पास’ चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर ‘दोस्ती: फ्रेंड्स फॉरएव्हर’, ‘जवानी दीवानी: अ युथफुल जॉयराइड’, ‘नॉटी बॉय’, ‘गेम’, ‘रकीब’, ‘रेड स्वस्तिक’ आणि ‘दिल बोले हडिप्पा!’ अशा अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली. पण 2012 साल शर्लिनसाठी पूर्णपणे वेगळं ठरलं.

7 / 8

याच काळात शर्लिन चोप्रा प्लेबॉय मॅगझिनसाठी निर्वस्त्र फोटोशूट करणारी पहिली भारतीय महिला ठरली. या फोटोशूटमुळे ती प्रचंड वादात सापडली. सुरुवातीला प्लेबॉय मॅगझिनने शर्लिनसोबत प्रत्यक्ष भेट झाल्याचं नाकारलं होतं, मात्र नंतर तिचं डिजिटल फोटोशूट प्रसिद्ध करण्यात आलं.

8 / 8

हे फोटोशूट समोर येताच देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आणि शर्लिन रातोरात वर्तमानपत्रं, टीव्ही चॅनेल्स आणि सोशल मीडियावर झळकू लागली. मनोरंजन विश्वात यामुळे मोठी खळबळ उडाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us