Photos | संगमनेरमधील हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेतील मनमोहक रानफुलं आणि हिरवाई

- संगमनेर तालुक्यात दक्षिण दिशेला असणारा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेवर नैसर्गिक सौदर्याची खाणच आहे.
- या ठिकाणी दिसणारी विविध प्रकारची रानफुलं आणि आणि हिरवाई पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात.
- या डोंगर रांगांवर चहुदिशांनी हिरवळीची जादू आहे.
- अनेक प्रकारची झाडं-झुडपं, वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं आणि वेगवेगळे पशुपक्षी अशी मोठी मेजवानी या ठिकाणी पर्यटकांना पाहायला मिळते.
- या डोंगर रांगेवर अनेक ठिकाणी पठाराचा भागही आहे.
- या ठिकाणी अगदी नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरव्यागार गवताची दाट चादर पसरलेली दिसते.
- ज्यांना उंचावरुन आजूबाजूच्या निसर्गाच्या सौदर्यांचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही डोंगर रांग पर्वणीच आहे.
- या डोंगर रांगांवर आजूबाजूच्या विस्तृत परिसराची निसर्गाने फुललेली दृश्य डोळ्यात साठवणे असो की ट्रेकिंग करत या भव्य डोंगराचे चढउतार अनुभवत निवांत चढाई करणे असे दोन्ही मार्ग पर्यटकांना भरभरुन आनंद देतात.
- या डोंगर रांगेवर अनेक प्रकारची रानफुलं दिसतात.
- फुलांसोबतच या ठिकाणी विविध प्रकारचं गवतही पर्यटकांचं लक्ष वेधून घेतं.
- ऐन पावसाळ्यात या ठिकाणी अनेक प्रकारचे हिरवेगार गवत डोंगराचं सौदर्य वाढवतात.
- फुलांसोबतच या ठिकाणी अनेक प्रकारचे वन्यजीवही पाहयला मिळतात.
- हिरवंगार गवत आणि त्यावर आलेली इवली इवली सुंदर फुलं निसर्गाच्या सौदर्यदृष्टीचीच प्रचिती देतात.
- या फुलांची रंगसंगती आणि त्यांचा आकार पर्यटकांना आकर्षून घेतो.
- एकूणच संगमनेरमधील निसर्गसंपन्न डोंगरांची ही रांग प्रसिद्ध पर्यटन स्थळ नसलं, तरी निसर्गाचा आनंद घेण्यासाठीचा निवांत ठिकाण आहे.















