श्रीमंत असो किंवा गरीब, प्रत्येकाच्या लग्नात हे गाणं वाजतच, एकदा लागलं की महिलापण धरतात ठेका, 49 वर्षांपासून सुपरहिट
गरीब असो किंवा श्रीमंत, प्रत्येक लग्नात हे गाणं वाजतच. गेल्या 49 वर्षांपासून सोशल मीडियासह लग्नात या गाण्याची असते प्रचंड चर्चा. एकदा सुरु झालं की प्रत्येकजण धरतो ठेका.

लग्नसमारंभ म्हटला की डीजेवर कोणते गाणे सर्वाधिक वाजते असा प्रश्न अनेकांना पडतो. आज अनेक नवीन आणि व्हायरल वेडिंग गाणी येत असली तरी जवळपास 49 वर्षांपूर्वीचे गाणं जे श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येकाच्या लग्नात ऐकायला मिळतेच.

हे गाणं म्हजणे 'आज मेरे यार की शादी है' हे गाणं आजही भारतीय लग्नसोहळ्यांमध्ये सर्वाधिक पसंतीचे गाणं मानले जाते. वराची एन्ट्री, मित्रांचा डान्स किंवा संपूर्ण वरात या गाण्याची धून लागली की उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

हे गाणे 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आदमी सड़क का' या चित्रपटातील असून ते महान गायक मोहम्मद रफी यांनी गायले आहे. चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा प्रमुख भूमिकेत होते. या गाण्याला संगीतकार रवि यांनी दिलेले संगीत आणि रफी यांचा दमदार आवाज यामुळे ते गाणं प्रचंड लोकप्रिय ठरले.

दरवर्षी अनेक नवीन गाणी प्रदर्शित होत असतात मात्र, यातील काही गाणी ही लग्न सोहळ्यात प्रचंड लोकप्रिय ठरतात. या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. बँड, डीजे किंवा ऑर्केस्ट्रा कोणतेही माध्यम असो हे गाणं वाजतेच.

लग्न सोहळ्यात प्रत्येक जण नाचण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे येतो. त्यामुळे 'आज मेरे यार की शादी है' हे गाणं आजही भारतीय लग्नसमारंभातील सदाबहार आणि सर्वाधिक आवडते वेडिंग सॉन्ग म्हणून ओळखले जाते.