
सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरलाय. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय.

गदर 2 हा चित्रपट 11 आॅगस्ट रोजी रिलीज झालाय. विशेष म्हणजे रिलीजच्या 37 व्या दिवशीही बाॅक्स आॅफिसवर गदर 2 चित्रपटाला जलवा हा दिसलाय.

गदर 2 ने रिलीजच्या 37 व्या दिवशी 70 लाख रूपयांची कमाई केलीये. 7 सप्टेंबर रोजी शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, याचा फार काही फटका गदर 2 ला बसला नाहीये.

गदर हा चित्रपट तब्बल 22 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मात्र, असे असतानाही चित्रपटाचा मोठा जलवा हा बघायला मिळालाय.

गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल आणि अमीषा पटेल हे दिसले. गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन सनी देओल याच्याकडून करण्यात आले.