PHOTO : पुढच्या वर्षी लवकर या…साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला भक्त निरोप देत आहेत.
-
-
सध्या मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यात ठिकठिकाणी सर्वत्र गणेश विसर्जनाचा (Anant Chaturdashi 2019) उत्साह दिसत आहे.
-
-
अनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर राज्यभरातील विविध समुद्र किनारे, नद्या-तलाव तसंच कृत्रिम तलावांजवळ उसळला आहे.
-
-
गेले अकरा दिवस भक्तिभावे पूजा करताना गणेशभक्तांमध्ये उत्साह असला, तरी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप (Anant Chaturdashi 2019) दिला जात आहे.
-
-
मुंबईतील अनेक गणपतींची मोठ्या थाटामाटात मिरवणूक गिरगाव, जूहू चौपाटीवर मार्गस्थ झाली आहे.
-
-
ही शान कोणाची, लालबागच्या राजाची अशा जयघोषात लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.
-
-
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला भक्त निरोप देत आहेत.
-
-
दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व गणेशमूर्तींवर श्रॉफ बिल्डींगमार्फत पृष्पवृष्टी करण्यात आली.
-
-
लाडक्या भक्ताला निरोप देताना सर्वच भक्तांचे डोळे पाणावले आहे.