
नृत्यांगना गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे. 30 सप्टेंबर रोजी गौतमी पाटीलच्या गाडीने एका रिक्षाला धडक दिली. या धडकीने रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. गौतमीच्या ड्रायव्हरने रिक्षा चालकाला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी तेथून पळ काढला. आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्याने गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले आहेत.

गौतमीच्या नृत्यावर अनेकदा टीका झाली आहे. तिचे हावभाव हे अश्लील असल्याचे म्हटले गेले होते. तसेच तिच्या नृत्यामुळे लावणीचे कार्यक्रम हे बदनाम झाल्याचेही अनेकांनी म्हटले. आता एका अभिनेत्याने गौतमीमुळे महाराष्ट्राचा बिहार झाल्याची टीका केली आहे.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून पवन चौरे आहे. त्याने गौतमीवर सडकून टीका केली आहे. नेमकं तो काय म्हणाला जाणून घ्या..

अभिनेत्याने त्याच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलाच आहेस. मग तू काय गोरगरीब जनतेलाही त्रास द्यायचा ठेका घेतलाय का? असा सवाल केला.

पुढे त्याने, 'तुझी कार रिक्षाला उडवते आणि तेथून तू पळून जातेस. तसेच तुझ्या गाडीत कोण कोण होते हे ही तुलाच. पोलीस यायच्या आधी तुझी गाडी टोचन लावून उचलली जाते ते केवळ प्रकरण दाबण्यासाठी' असे त्याने म्हटले.

अभिनेता संतापून पुढे म्हणाला, बिचाऱ्या रिक्षाचालकाला किती लागलय, त्याचे काय झाले आहे? याची चौकशी न करता तू तेथून पळ काढला. कारण तुझे काळे धंदे बाहेर आले असते. आज रिक्षाचालक दीनानथ रुग्णालयात व्हेंटीलेटरवर आहे. या घटनेला चार दिवस झाले तरी तू साधं एक माणुसकीच्या३ नात्याने विचारपुसही केली नाहीस. हेच तुझे संस्कार आहेत का?

पवनने गौतमीच्या कृत्याचा निषेद नोंदवत म्हटले की, एक गोष्ट लक्षात ठेव, एक सामान्य माणूस कोणाला जितका वर घेऊन जातो तेवढाच खाली आपटू पण शकतो. तुझ्या या कृत्याचा जाहीर निषेध