लाखो चाहत्यांची क्रश असणाऱ्या अभिनेत्रीने शेअर केला नवीन लूक, फोटो पाहून चाहते थक्क, कोण आहे ती?
सिंपल आणि गोड स्वभावाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जिनिलियाने शेअर केला लाल रंगाच्या ड्रेसमध्ये रॉयल लूक. सौंदर्य पाहून चाहते देखील झाले थक्क.

मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने आणि साध्या-गोड स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री जिनिलिया देशमुख सध्या चर्चेत आहे.
अभिनेता इम्रान हाश्मीच्या आगामी ‘गनमास्टर जी 9’ या बहुप्रतीक्षित चित्रपटामुळे जिनिलियाचीही चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील ‘अफसाना बनाया आपने’ हे पहिले गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले.
या गाण्यात जिनिलियाची खास झलक पाहायला मिळत असून, तिच्या उपस्थितीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, गाण्याच्या प्रसिद्धीदरम्यान जिनिलियाने सोशल मीडियावर तिच्या नव्या फोटोशूटमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस आणि रॉयल अंदाज पाहायला मिळत आहे. जिनिलियाने लाल रंगाचा भव्य एथनिक आउटफिट परिधान केला आहे. या पारंपरिक लुकला तिने हटके ॲक्सेसरीजची जोड देत त्यात मॉडर्न टच दिला आहे.
विशेष म्हणजे तिच्या हातातील बटरफ्लाय हँड ॲक्सेसरी आणि कानातील गोल्डन एअर कफ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या खास फोटोशूटसोबत जिनिलियाने ‘God is kind – Life is good’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे.