जिनिलियाने शेअर केले सासूबाईंसोबतचे खास फोटो, कॅप्शनने वेधलं सर्वांचं लक्ष, सर्वांकडून होतंय कौतुक
सासूबाई वैशाली देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री जिनिलियाने शेअर केले सासूबाईंसोबतचे खास फोटो. साडीने वेधलं सर्वांचं लक्ष. कॅप्शनची होतेय प्रचंड चर्चा.

बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही तिच्या सिंपल स्वभाव आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असते. अशातच आता अभिनेत्रीने तिचे सासूबाईंसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.
जिनिलिया आणि सासूबाई वैशाली देशमुख यांच्यातील प्रेमाचं नातं नेहमीच चर्चेत असतं. सासू-सुनेच्या पारंपरिक नात्यापलीकडे जाऊन या दोघींमध्ये आई-मुलीसारखं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे.
नुकताच वैशाली देशमुख यांचा वाढदिवस असल्याने जिनिलीयाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. वैशाली देशमुख या दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पत्नी आहेत.
जिनिलीयाने सासूबाईंसोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले असून, या फोटोंमध्ये दोघीही पारंपरिक सिल्क साड्यांमध्ये दिसत आहेत. त्यांच्या या खास लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या फोटोंसोबत जिनिलीयाने लिहिलेल्या भावूक संदेशानेही सर्वांचं मन जिंकलं. आयुष्यात कोणतीही भूमिका पार पाडण्याआधी स्वतःची ओळख जपणं आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःकडे पाहणं किती महत्त्वाचं आहे, याची शिकवण सासूबाईंनी दिल्याचं तिने म्हटलं आहे.