Girija Oak: खूपच गोड.. गिरीजा ओकचा शॉर्ट हेअरकट लूक; ‘नॅशनल क्रश’वर चाहते पुन्हा फिदा!

Girija Oak: 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक तिच्या नव्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. गिरीजाने नवीन हेअरकट केला असून शॉर्ट हेअरमध्ये ती खूपच सुंदर दिसत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

| Updated on: Aug 10, 2026 | 11:15 AM
1 / 5
Girija Oak short hair look: 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. निळ्या साडीतील अत्यंत साध्या पण तितक्याच आकर्षक लूकमुळे गिरीजा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. आता तिचा वेस्टर्न आऊटफिट आणि शॉर्ट हेअरमधील हा नवीन लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Girija Oak short hair look: 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. निळ्या साडीतील अत्यंत साध्या पण तितक्याच आकर्षक लूकमुळे गिरीजा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. आता तिचा वेस्टर्न आऊटफिट आणि शॉर्ट हेअरमधील हा नवीन लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

2 / 5

गिरीजा अमेरिकेतल्या 'नाफा फिल्म फेस्टिव्हल'ला उपस्थित राहिली होती. यावेळी रेड कार्पेटवर तिचा नवीन, अनोखा आणि सुंदर लूक पहायला मिळाला. गिरीजाने लाल रंगाचा सुंदर वनपीस परिधान केला होता. शॉर्ट हेअरमधील तिचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. गिरीजाने केस कापले असून या नव्या हेअरकटमध्येही ती तितकीच सुंदर दिसत आहे.

3 / 5

गिरीजाने फक्त रेड कार्पेट लूकसाठी अशी हेअरस्टाइल केल्याचं काहींना वाटलं होतं. मात्र जेव्हा तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यातही ती शॉर्ट हेअरमध्ये दिसली, तेव्हा नेटकऱ्यांना खात्री पटली की गिरीजाने तिचा लूक बदलला आहे. तिचा हा नवीन लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.

4 / 5

'हेअर कट आणि ट्रान्सफॉर्मेशन सुंदर आहे', अशी कमेंट एका युजरने केली. तर 'हा हेअरकट तुला खूपच छान दिसतोय' असं दुसऱ्याने म्हटलंय. 'या नव्या हेअरस्टाइलमध्ये किती गोड दिसतेस तू', अशा शब्दांत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. गिरीजाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

5 / 5

गिरीजा नुकतीच 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये तिने कंगना राणौतसोबत भूमिका साकारली होती. दमदार अभिनयकौशल्यासोबतच गिरीजा तिच्या सुंदर लूकमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us