काय सांगता! एवढ्या मोठ्या टांगा, तरुणीची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
जगात अशी काही लोकं असतात जी त्यांच्या खास गुणांमुळे ओळखली जातात. अशा लोकांमधील गुण जाणून लोकही थक्क होतात. अशीच मॅसी कुरिन नावाची एक मुलगी देखील सध्या चर्चेत आहे.

लोक मॅकीला तिच्या लांब पायांमुळे ओळखतात, परंतु ती म्हणते की यामुळे तिला काही समस्यांना देखील सामोरे जावे लागते. ना तिच्या आकारानुसार कपडे बाजारात मिळतात ना ती सामान्य मुलींप्रमाणे गाडीत आरामात बसू शकते, पण तरीही ती आनंदी असते आणि म्हणते की आपण आपल्या शरीराचे सौंदर्य कधीही लपवू नये, उलट अभिमानाने दाखवले पाहिजे.
- जगात अशी काही लोकं असतात जी त्यांच्या खास गुणांमुळे ओळखली जातात. अशा लोकांमधील गुण जाणून लोकही थक्क होतात. अशीच मॅसी कुरिन नावाची एक मुलगी देखील सध्या चर्चेत आहे. अमेरिकेत राहणारी मॅकी तिच्या लांब पायांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. तिच्याइतके लांब पाय जगात इतर कोणत्याही मुलीचे नाहीत. तिच्या या अनोख्या गुणामुळे तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.
- तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मॅकीच्या फक्त पायांची लांबी 4 फूट 5 इंच आहे, तर तिची एकूण लांबी 6 फूट 10 इंच आहे. जगात एवढ्या उंच मुली कुठे बघायला मिळतात? जेव्हा मॅकी तिच्या वयाच्या मुलीच्या किंवा आईच्या शेजारी उभी असते तेव्हा ती एखाद्या बटू स्त्रीच्या शेजारी उभी असल्यासारखे वाटते. तसंच पुरुषपण मॅकीएवढे उंच नसतात. पण, काही WWE फायटर्सची लांबी नक्कीच तिच्या इतकी आहे.
- गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार मॅकीच्या दोन्ही पायांची लांबी सारखी नसून लहान आणि मोठी आहे. फक्त तिच्या उजव्या पायाची लांबी 4 फूट 5 इंच आहे, तर डाव्या पायाची लांबी थोडी कमी आहे. हे सहसा मॅकीकडे पाहून कळत नसले तरी, प्रोफेशनल मॉडेल मॅकी आता 20 वर्षांची आहे. 23 मार्चलाच तिचा वाढदिवस होता.
- मॅकीला असं कधीच वाटलं नव्हते की, ती तिच्या पायांनी विश्वविक्रम करू शकेल. एका फॅशन शोदरम्यान, तिला अचानक ही कल्पना सुचली जेव्हा तिच्या पायांच्या लांबीनुसार लेगिन्स कस्टमाइझ केल्या गेल्या आणि तिला ते घालायला दिले गेले. त्यानंतरच तिने ही अनोखी कामगिरी आपल्या नावावर केली.
- लोक मॅकीला तिच्या लांब पायांमुळे ओळखतात, परंतु ती म्हणते की यामुळे तिला काही समस्यांना देखील सामोरे जावे लागते. ना तिच्या आकारानुसार कपडे बाजारात मिळतात ना ती सामान्य मुलींप्रमाणे गाडीत आरामात बसू शकते, पण तरीही ती आनंदी असते आणि म्हणते की आपण आपल्या शरीराचे सौंदर्य कधीही लपवू नये, उलट अभिमानाने दाखवले पाहिजे.





