GK : चीनमध्ये किती टक्के लोक शाकाहारी आहेत? हैराण करणारा आकडा समोर

Chinese Veg Food : चीनमधील शाकाहाराबद्दलची परिस्थिती भारतातील परिस्थितीपेक्षा खूप वेगळी आहे. चीनमध्ये शाकाहारी लोकांचे प्रमाण भारताच्या तुलनेत कमी आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 28, 2025 | 11:01 PM
1 / 5
शाकाहारी लोकांचे प्रमाण : चीनमध्ये साधारणपणे 4% ते 5% लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत. ही टक्केवारी कमी वाटत असली तरी चीनच्या 140 कोटी लोकसंख्येचा विचार करता ही संख्या सुमारे 5 कोटी ते 7 कोटी इतकी मोठी आहे.

2 / 5
बौद्ध धर्माचा प्रभाव: चीनमध्ये शाकाहाराचा सर्वात मोठा आधार 'बौद्ध धर्म' आहे. सुमारे 4 कोटी चिनी बौद्ध लोक धर्माच्या शिकवणुकीनुसार शाकाहारी जीवनशैलीचे पालन करतात.

3 / 5
तरुण शाकाहाराकडे वळले : एका सर्वेक्षणानुसार, चीनमधील सुमारे 30% शाकाहारी लोक 20 ते 29 वयोगटातील आहेत. सुशिक्षित तरुण पिढी पर्यावरण संरक्षण आणि प्राण्यांच्या हितासाठी शाकाहाराकडे वळत आहेत.

4 / 5
आरोग्याबाबत जागरूकता: चीनमधील श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय लोक आरोग्याच्या कारणास्तव (वजन कमी करणे, मधुमेह नियंत्रण) मांसाहार कमी करून 'प्लांट-बेस्ड' (वनस्पतीजन्य) आहाराला पसंती देत आहेत.

5 / 5
शाकाहारी शहरे: शांघाय, बीजिंग, चेंगडू आणि ल्हासा या शहरांमध्ये शाकाहारी रेस्टॉरंट्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकट्या शांघायमध्ये 100 हून अधिक 'व्हेगन' रेस्टॉरंट्स आहेत.