
मराराष्ट्र: मराराष्ट्र अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. मुंबई, रत्नागिरी, रायगड या ठिकाणांवरून अरबी समुद्राचे मनमोहक रुप दिसते. महाराष्ट्रात मासेमारीही मोठ्या प्रमाणात केली जाते.

गुजरात: गुजरात राज्याचा पश्चिम भाग हा अरबी समुद्राशी जोडलेला आहे. त्यामुळे गुजरात हे भारतातील सर्वात मोठे किनारी राज्य आहे. गुजरातला जवळपास 2340 किलोमीटरचा किनारा आहे.

गोवा: गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे, यात फक्त दोन जिल्हे आहेत. गोवा पूर्णपणे अरबी समुद्राशी जोडलेले आहे. या राज्याची अर्थव्यवस्था ही अरबी समुद्राच्या पर्यटनाशी जोडलेली आहे.

कर्नाटक: कर्नाटक हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील महत्त्वाचे राज्य आहे. कर्नाटकमध्ये कारवार आणि मंगळुरूसारखी महत्त्वाची बंदरे आहेत.

केरळ: केरळ भारताच्या दक्षिण भागातील अरबी समुद्राच्या सीमेवरील एक प्रमुख राज्य आहे. या राज्यात कोचीन हे मुख्य बंदर आहे. तसेच दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेशही अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत.