
नवरदेव जातो नांदायला : मेघालयमधील खासी जमातीमध्ये लग्नानंतर मुलगी सासरी जात नाही, तर मुलगा आपल्या पत्नीच्या घरी राहायला येतो. येथे मुलगी नव्हे तर मुलगा नांदायला जातो.

मातृसत्ताक व्यवस्था : या समाजात पितृसत्ताक नाही, तर मातृसत्ताक पद्धत चालते. म्हणजे कुटुंबाची ओळख, मालमत्ता आणि वंशाची परंपरा वडिलांकडून नाही, तर आईच्या नावावरून पुढे चालते.

सर्वात लहान मुलीला वारसा हक्क : कुटुंबाची मालमत्ता आणि घराचा अधिकार सर्वात लहान मुलीला मिळतो, जिला खासी भाषेत 'का खाद्दूह' म्हटले जाते. तीच घराची प्रमुख असते आणि आई-वडिलांची देखभाल करण्याची जबाबदारीही तिच्यावर असते.

आईचे आडनाव : या समाजात मुले वडिलांचे नाही, तर आपल्या आईचे आडनाव लावतात. यामुळे कुटुंबाची ओळख आईच्या वंशाने टिकून राहते.

परंपरेचे उद्दिष्ट: ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. असे मानले जाते की, जुन्या काळी युद्धात पुरुषांचे मृत्यू जास्त होत असत, त्यामुळे वंशाचे संरक्षण करण्यासाठी आणि स्त्रियांना सुरक्षित व मजबूत करण्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली.