
नैसर्गिक साठवणूक प्रक्रिया: नारळाच्या आत असणारे पाणी हे प्रत्यक्षात झाडाच्या मुळांद्वारे शोषले गेलेले पाणी असते. नारळाचे झाड जमिनीतून पाणी शोषून ते आपल्या फळांपर्यंत पोहोचवते.

एंडोस्पर्म : विज्ञानाच्या भाषेत या पाण्याला 'लिक्किड एंडोस्पर्म' म्हटले जाते. झाडाच्या पेशींमधील हे पाणी फळाच्या आत साठवले जाते, यामुळे फळाची वाढ चांगली होते.

पाण्याचे रूपांतर मलाईत: नारळ जसजसा जूना होऊ लागतो, तसतसे हे पाणी हळूहळू घट्ट होऊ लागते आणि त्याचे रूपांतर पांढऱ्या मलाईत (खोबरे) होते. कच्च्या नारळात पाण्याचे प्रमाण जास्त असते कारण ही प्रक्रिया तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात असते.

पोषक तत्वांचा खजिना: हे पाणी झाडाच्या विविध भागांमधून गाळून नारळात येते, त्यामुळे त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडिअम यांसारखी खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात. म्हणूनच हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

नैसर्गिक फिल्टर: जमिनीतून शोषले गेलेले पाणी नारळाच्या झाडाच्या लांब देठातून आणि पेशींमधून प्रवाहित होताना नैसर्गिकरित्या फिल्टर होते. त्यामुळे नारळाच्या आत पोहोचलेले पाणी अत्यंत शुद्ध आणि निर्जंतुक असते.