
देशात सध्या सोने आणि चांदीच्या दराची चांगलीत चर्चा रंगली आहे. कारण सोन्याचे दर हे दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. अशातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. तसेच चांदीचे दर देखील घसरले आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर आजचा दिवस योग्य आहे. वाचा आजच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे ते...

सोने-चांदी आज स्वस्त झाले आहे. लग्नसराईच्या दिवसांत ग्राहकांना दिलासा देणारी ही बातमी आहे. 4 डिसेंबर 2025 रोजी गुरुवारी सराफा बाजारात सोने आणि चांदी दोन्हीच्या भावात घसरण नोंदवली गेली आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्याची स्थिती पाहिली तर 10 ग्रॅमचा भाव आज 1,31,325 रुपये आहे. ही जीएसटीसहीत भाव आहे. कालच्या आजच्या भावात 500 रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.

सराफ बाजातात आज 4 डिसेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 1 ग्रॅमला 12000 रुपये झाला आहे, काल हा दर 12,020 रुपये होता. म्हणजे 20 रुपयांनी स्वस्त झाले. त्याचप्रमाणे 8 ग्रॅमचे दर 96000 रुपये आणि 10 ग्रॅमचे दर 1,20,000 रुपये झाले आहेत. काल अनुक्रमे 96,160 आणि 1,20,200 रुपये होते.

चांदीच्या बाबतीतही आज घसरण दिसली.चांदीचे दर जीएसटी सह 1 लाख 83 हजार 340 रुपयांवर पोहोचले आहेत. सकाळी 10 वाजता चांदीच्या दरात 1 हजार रुपयांनी वाढ झाली त्यानंतर दुपारी 12 वाजता 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. जर तुम्ही विचार करत असाल चांदीच्या वस्तू घ्यायच्या तर आज खरेदी करु शकता.

मागील काही दिवस चांदीच्या भावात थोडी तेजी होती, पण आज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लग्नसराईत दागिने घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा योग्य वेळ ठरू शकतो, पण स्थानिक सराफाकडे जाऊन ताजे भाव नक्की तपासावेत कारण दिवसभरात भावात थोडाफार बदल होऊ शकतो.