Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! पुन्हा सोन्याचे भाव कडाडले, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: आयात शुल्क मध्ये वाढ तसेच चांदीचे आयातीवर लावलेले निर्बंध यामुळे सोन्याने चांदीच्या दरात वाढ झाल्याचा सराफ व्यवसायिक यांचं म्हणणं आहे.

| Updated on: May 18, 2026 | 4:34 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने खरेदी करावे की नाही या संभ्रमात अनेकजण होते. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी करु नका असे आवाहन केले आहे. त्यानंतर आता सोन्याचे भाव पाहून खरच सोने खरेदी करु नये असे सर्वसामान्यांना वाटू लागले आहे.

2 / 5

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे सतत वाढत असल्याचे पाहायला मिळाले. आज तर सोन्याच्या भावाने सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. जाणून घ्या आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार.

3 / 5

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

4 / 5

आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 61 हजार 195 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 75 हजार 10 रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात दीड टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us