Gold Rate : सोन्याचा भाव पाहून घामच फुटला, एका आठवड्यात तब्बल…10 ग्रॅमचा किंमत वाचून अचंबित व्हाल!

गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव चांगलाच वाढत आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा या दोन्ही धातूंनी चांगलीच कमाल केली आहे. सामान्यांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसणार आहे.

| Updated on: Jan 04, 2026 | 7:32 PM
1 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात चढउतार झालेला पाहायला मिळत आहेत. 2025 या सालात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना जरबदस्त फायदा झाला. त्यांना चांगला परतावा मिळाला. परंतु ज्या लोकांना दागिने करायचे होते, त्यांच्या खिशाला मात्र चांगलीच झळ बसली. आता नव्या वर्षातही सोने आणि चांदीचा भाव चांगलाच वाढला आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार आठवड्याभरात सोन्याचा भाव वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 750 रुपयांनी वाढला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा  भाव 760 रुपयांनी वाढला आहे. हा भाव पाहून सध्या सोन्याचा भाव वाढत असला तरीदेखील सामान्य लोक अजूनही सोन्याची खरेदी करत आहेत.

3 / 5
राजधानी दिल्लीमध्ये 4 जानेवारी 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,35,970 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,24,650 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला. मुंबईचा विचार करायचा झाल्यास 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,35,820 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,24,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.

4 / 5
चांदीच्या भावातही चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. एका आठवड्यात चांदीचा भाव साधारण 3,100  रुपयांनी वाढला. सध्या देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव 2,41,000 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला. चांदीच्या भावात आतापर्यंत 160 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)