
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात तढ-उतार पाहायला मिळत आहेत. बुधवारीदेखील या दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात वाढ झाली. त्यामुळे सोने खरेदीदारांच्या खिशाला आज चांगलीच झळ बसली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने, चांदीच्या भावात तेजी आल्यामुळे आज दिल्लीच्या सराफा बाजारातही सोन्याचा भावा वाढला. बुधवारी दिल्लीमध्ये 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 1500 रुपयांनी वाढून तो 1,27,300 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.

तसेच दिल्लीच्या साराफा बाजारात 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा भावदेखील 1500 रुपयांनी वाढून तो 1,26,700 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत वाढला. सोन्यासोबतच चांदीच्या भावातही मोठी तेजी पाहायला मिळाली. बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 4000 रुपयांनी वाढून तो थेट 1,60,000 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला.

पाहायचं झालं तर मंगळवारी सोने आणि चांदीचा भाव गडगडला होता. बुधवारी 99.9 टक्के शुद्ध असलेले सोने 3900 रुपयांन कमी होऊन 1,25,800 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचले होते.

तर चांदीचा भाव 7800 रुपयांनी कमी होऊन थेट 1,56,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. दरम्यान, सध्यातरी सोने, चांदीच्या भावात मोठे चढउतार होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे भविष्यात या मौल्यवान धातूंचा भाव नेमका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.